Latest News

6/recent/ticker-posts

भादा प्रशालेत तंबाखू मुक्त उपक्रमांतर्गत निबंध स्पर्धा

भादा प्रशालेत तंबाखू मुक्त उपक्रमांतर्गत निबंध  स्पर्धा

          


 ( बाबुराव आगलावे )

आरोग्यासाठी हानिकारक व घातक असलेले तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यास टाळावे यासाठी गाव पातळीवर नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी औसा तालुक्यातील ग्रामीण भागातील जि. प. कन्या व प्रशाला, भादा या प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश अनंतवार यांनी निंबध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा आयोजित केली  आहे.  दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश अनंतवार यांच्या मार्गदर्शनाखाली  सर्व शिक्षकांनी जि. प. कन्या व प्रशाला, भादा या दोन्ही प्रशालेतील   9 वी  व 10 वी वर्गातील  मुली  व  मुले  यांची दि 25 - 01 - 2021 रोजी   " तंबाखू मुक्त  अभियान उपक्रमांतर्गत निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा "  घेतली. गावपातळीवर नागरिक व तरुण पिढीला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी  तंबाखू मुक्त अभियान  उपक्रमांतर्गत निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा   निश्चितच उपयुक्त ठरेल, असे वाटते. दोन्ही प्रशालेतील शिक्षक तंबाखू मुक्त आहेत , असे दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक रमेश अनंतवार यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments