Latest News

6/recent/ticker-posts

डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र महाविद्यालयात विविध उपक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन

डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र महाविद्यालयात विविध उपक्रमांचे व स्पर्धांचे आयोजन


निलंगा:( तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) महाराष्ट्र महाविद्यालयाच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र शिक्षण समितीचे  संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी साहेबांच्या जीवनकार्यावर आधारीत  दि. 06/02/2021 रोजी निबंध स्पर्धा, व वाणिज्य विभागाच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे.   


दिनांक 8 फेब्रुवारी 2021 वार सोमवार रोजी राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर  आयोजित करण्यात आले आहे. 

या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, कृषी व जलसिंचन विकासात योगदान या विषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसांठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. दि. 09/02/2021 रोजी भित्तीपत्रक व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच सकाळी 11.00 वाजता महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे सरांचे डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

Post a Comment

0 Comments