निलंगा तालुका महाविकास आघाडीच्या वतिने गंगादेवी माधवराव पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पन
निलंगा:( तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व औसाचे माजी आ.बसवराज पाटील यांच्या मातोश्री गंगादेवी माधवराव पाटील यांचे दुःखद निधन झाले. आज निलंगा येते तालुका महाविकास आघाडीच्यावतिने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिवसेना निलंगा तालुकाप्रमूख अविनाश रेशमे, प्रा.दयानंद चोपने, नारायण सोमवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर प्रमुख इस्माईल लदाफ, युवक शहर प्रमूख धम्मानंद काळे, विलास सुर्यवशी, ईश्वर पाटील, प्रा.आण्णासाहेब मिरगाळे, प्रशांत वाजरवाडे, शुभम डांगे, रवी नागरसोगे, प्रसाद मठपती आदी जण उपस्थित होते.

0 Comments