भारत सरकारच्या "राष्ट्रीय युवा स्वयंसेवक" पदा करीता युवा कार्यकर्त्यांनी ऑनलाइन अर्ज करावा- राजेंद्र पातोडे
मुंबई: (प्रतिनिधी मनोज बरडे) दि. ५ - केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, युवा कार्यक्रम विभागाच्यावतीने राष्ट्रीय युवा कोर योजनेचा लाभ महाराष्ट्रातील युवक युवतीनी घ्यावा, असे आवाहन युवा वंचितचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केले आहे. भारत सरकारच्या युवा संघटन व युवा नेतृत्वा द्वारे राष्ट्र विकास व राष्ट्रबांधणी मध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत करण्यात आले आहे. आरोग्य, साक्षरता, सार्वजनिक क्षेत्रात जनजागृती, शासकीय अभियान या पद्धतीच्या कार्यक्रमात प्रमुख भूमिका पार पाडणे, विविध कार्यक्रमांचे आयोजन करणे, आपात्कालीन परिस्थिती मध्ये प्रशासनास सहकार्य करणे असे एकंदर कार्याचे स्वरूप आहे.त्यामध्ये ५ हजारांचे सर्व भत्ता सह दरमहा मानधन असून किमान दहावी उत्तीर्ण असण्याची अट आहे. शिक्षण सुरू असलेल्या युवक युवतींनी अर्ज करायचे नसून १८ ते २९ दरम्यान वय असलेल्या इतर युवक युवतींनी अर्ज करायचे आहेत. सदर नियुक्ती एक वर्षासाठी राहणार असून उत्कृष्ट कार्य असल्यास एक वर्ष मुदतवाढ दिली जाऊ शकते. यासाठी नेहरू युवा संघटनची वेबसाईट www.nyks.nic.in किंवा https://nyks.nic.in/NationalCorps/nyc.html वर ह्या योजनेची संपूर्ण माहिती उपलब्ध असून ऑनलाईन पद्धतीने २० फेब्रुवारी पर्यंत अर्ज सादर सादर करण्याची मुदत दिली आहे, सदर पदाकरिता कार्यक्षम युवक युवतींनी अर्ज सादर करून लाभ घ्यावा, असे आवाहन देखील वंचित बहूजन युवा आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments