Latest News

6/recent/ticker-posts

शिष्यवृत्ती परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी एक महिण्याच्या ऑनलाईन शिबिराचे आयोजन

शिष्यवृत्ती परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी एक महिण्याच्या ऑनलाईन शिबिराचे आयोजन 


लातूर:(जिमाका) दि. 5 - जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरूड च्या वतीने जिह्यातील इ. ५ वी व ८ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यासाठी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीचा विचार करून एक महिना ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दि. ८ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२१ या कालावधीत सायंकाळी ६.०० ते ८.०० या वेळात प्रत्येकी एक तास विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे. ५ वी साठी सायंकाळी ६.००  ते ७.०० तर ८ वी साठी सायंकाळी ७.०० ते ८.०० हा वेळ राहील. हे मार्गदर्शन DIET Latur  या यूट्यूब वर प्रसारित करण्यात येणार आहे. या शिबिरासाठी जिल्ह्यातील प्रथितयश शिक्षक शिवशंकर राऊत, गणेश कलशेट्टी, प्रमोद हुडगे, उमाकांत कोंपले, गणपत जाधव, विनायक साखरे, रामकिशन सुरवसे, अजित शिरूरे, शिवराज स्वामी, जगदेवी खानापुरे, वैशाली गोकुळे, बाबासाहेब इंगळे, उत्तम शिंदे, मंजुषा कोकणे, गणेश जाधव, प्रमोद कटके, अशोक गायकवाड, मुरलीधर शिंदे, विजयकुमार माळाळे व विद्यासागर काळे मार्गदर्शन करणार आहेत. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. भागीरथी गिरी, ज्येष्ठ अधिव्याख्याता यांच्या मार्गदर्शनाखाली रमेश माने, मारुती कदम, सतीश सातपुते, सतीश भापकर, सुनील राजुरे व नागेश लोहारे सर्व विषय सहाय्यक परिश्रम घेत आहेत. जिल्ह्यातील शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी याचा लाभ घ्यावा तसेच गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, बीआरसी साधन व्यक्ती यांनी जास्तीत जास्त विद्यार्थी उपस्थित राहतील यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन प्राचार्य अनिल मुरकुटे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments