निलंगा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात सत्कार
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी हलगरा गावचे दत्तोपंत पाटील व मन्नतपुरचे व्यंकटराव पांचाळ यांची सदस्यपदी निवड झाल्यामुळे शिवसेना मध्यवर्ती कार्यालय निलंगा येथे शिवसेना तालुकाप्रमुख अविनाश दादा रेशमे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उपस्थित प्रा. अण्णासाहेब मिरगाळे, प्रशांत वांजरवाडे आदी जण शिवसैनिक उपस्थित होते.

0 Comments