उपजिल्हा रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) अखंड भारत देशाचे प्रथम स्वातंत्र्यवीर, राष्ट्रवीर, ज्यांनी सर्व जाती धर्माच्या मावळ्याच्या मनात राष्ट्रप्रेम निर्मान केले ज्यांनी शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली त्याना स्वंयपूर्न केले, ज्यानी महिलांना विशेष सन्मान दिला रयतेचे राजे, बारा बलूतेदाराच्या हाताथ शस्त्र देवून त्यांना लढावू बनविले.
अख्ख्या जगाने आदर्श घ्यावे आणि साऱ्या जगाला प्रेरणादायी ठरणारे असे "जगातील सर्वश्रेष्ठ राजे, छत्रपती" विश्ववंदनीय, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, श्रीमंत विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांची 391 वी जंयती
covid-19 नियमाचे पालन करत निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात साजरी करण्यात आली.
सुरुवातीस उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिलीप सौंदळे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी डॉ.गित्ते , डॉ. अभंगे , डॉ.चव्हाण मॅडम , श्री.म्हेत्रे , जगताप , दूधभाते ,दत्तात्रय म्हेत्रे , रामेश्वर श्रीमंगले , शेरीकर , श्रीमती भाग्यश्री काळे , शिंदे , अंजुम सौदागर , माने , जाधव , पाटील , कराळे आदी जण उपस्थित होते.

0 Comments