Latest News

6/recent/ticker-posts

दिव्यांगाकरीता अल्पमुदतीचे व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन

दिव्यांगाकरीता अल्पमुदतीचे व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन


लातूर:(जिमाका) दि.19 - समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, लातूर मार्फत मार्च महिन्यामध्ये दिव्यांगाकरीता विविध अल्प मुदतीचे व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या  प्रशिक्षणामध्ये 1. पेपर बॅग व  एन्वलप  बनविणे 2. द्रोण पत्रावळी तयार करणे 3. विविध प्रकारचे लोणचे तयार करणे 4. नुडल्स बनविणे 5. झाडू बनविणे 6. मेणबत्ती बनविणे अशा रोजगाराभिमुख व्यावसायिक प्रशिक्षणाचे तालुकास्तरावर आयोजन करण्यात येत असून पात्र दिव्यांग व्यक्तींनी आपली नांव नोंदणी त्या-त्या तालुक्याच्या गट विकास अधिकारी यांचेकडे दि.26 फेब्रुवारी 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत करावी असे आवाहन समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी केले आहे.

तरी लातूर जिल्हयातील पात्र व इच्छुक दिव्यांग लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असेही कळविण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments