Latest News

6/recent/ticker-posts

शेताच्या बांधावर शेतकऱ्यांची शेतीशाळा

 शेताच्या बांधावर शेतकऱ्यांची शेतीशाळा


देवणी:( शहर प्रतिनिधी/विक्रम गायकवाड ) आज दि. 09/02/2021 रोजी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानामध्ये  समाविष्ट असणारे मौजे बोळेगाव येथे शेतीशाळा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी शेतकरी बंधू संजीव आंबेवाले यांच्या प्लॉटची निवड करून यांच्या शेतामध्येच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यामध्ये बोळेगाव येथील 25 शेतकऱ्यांचे प्रात्यक्षिकासाठी निवड करण्यात आलेली होती. त्याप्रमाणेच या शेतकऱ्यांना हरभरा या पिकावरील किड व रोग या बद्दल सखोल मार्गदर्शन या ठिकाणी प्रात्यक्षिकासह करून शेतीशाळा किट व निविष्ठा(किटकनाशक,कामगंध सापळे) वाटप करण्यात आले. यावेळी कृषी पर्यवेक्षक श्री रमेश बनसोडे  यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

शेतिशाळेचे प्रशिक्षण घेतल्याने शेतकरी हा आपल्या शेतात असणारे शत्रु किडी व मित्र किटक ओळखू शकतो. त्यामुळे तो त्या शेतातील व्यवस्थापनाचे निर्णय स्वत: घेऊ शकतो. सदरील  कार्यक्रमास कृषी पर्यवेक्षक रमेश बनसोडे, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे तालुका व्यवस्थापक सागर तापडिया प्रगतिशील शेतकरी  ओंकार आंबेवाले, विक्रम गायकवाड शेतकरी मित्र इत्यादिंची उपस्थिती लाभली.

Post a Comment

0 Comments