Latest News

6/recent/ticker-posts

लातूर जिल्ह्यात वादळी वारा,पाऊस पडण्याचे हवामान खात्याचे संकेत;नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन

लातूर जिल्ह्यात वादळी वारा,पाऊस पडण्याचे हवामान खात्याचे संकेत;नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन


लातूर:(जिमाका) दि.18 - जिल्हयात दिनांक 20 ते 22 मार्च 2021 या कालावधीत वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहे. नैसर्गिक आपत्तीचे नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवून दर तासानी पडणाऱ्या पावसाबाबत तसेच काही हानी झाल्यास त्याबाबत संदेश या कार्यालयास दयावे, असे निर्देश अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी दिले आहेत. या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हयातील सर्व शेतकरी/नागरिक यांनी खबरदारी घ्यावी. विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे, शेतकऱ्यांनी दुपारी 3 ते 7 या वेळेत शेतीची व इतर कामे करु नये कारण सदर कालावधीतमध्ये विजा पडण्याची शक्यता  जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे झडाखाली/पाण्याच्या स्त्रोताजवळ/विद्युत खांबाजवळ बांधू नयेत त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावीत. आपल्या जनावरांना सुक्षित ठिकाणी स्थलांतरित करुन स्वत: सुरक्षित ठिकाणचा आसरा घ्यावा व पाऊस सुरु असताना विजेच्या तारा/जुन्या इमारती कोसळण्याची शक्यता असते. तरी त्यापासून दूर राहण्याची  खबरदारी घ्यावी. अशा सूचना आपल्या अधिनस्त पोलीस अधिकारी/तलाठी/मंडळ अधिकारी/ग्रामसेवक/सरपंच/कृषि सहाय्यक यांचेव्दारे निर्गमित करुन आपण आपल्या तालुक्यातील गावाना सावधगीरीची सूचना देवून योग्य ती उपाययोजना करावी व कार्यालयास सादर करावा. सदरच्या कालावधीत कोणीही आपले मुख्यालय सोडू नये असे अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी निर्देशित केले आहे.

Post a Comment

0 Comments