Latest News

6/recent/ticker-posts

निलंगा तालुका संजय गांधी निराधार योजनेची बैठक संपन्न

निलंगा तालुका संजय गांधी निराधार योजनेची बैठक संपन्न


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) आज निलंगा तहसील कार्यालयामध्ये निलंगा तालुका संजय गांधी निराधार योजनेची बैठक नायब तहसीलदार अरुण महापुरे यांच्या दालनात कमिटीचे अध्यक्ष देवदत्त पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी बैठकीमध्ये 12 मार्च 2021 पर्यंतचे एकूण 1777 अर्ज पैकी 1437 अर्ज मंजूर करण्यात आले तर 340 अर्ज नामंजूर झाले. या बैठकीला कमिटीचे सदस्य सुरेंद्र धुमाळ, गोविंद शिंगाडे, विनोद आर्य, दिलीप पाटील, नागनाथ पाटील, व्‍यंकटराव पांचाळ, गोविंद सूर्यवंशी, राजमाता दानाई, समद लालटेकडे सह आदी जण उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments