निवडश्रेणी व वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना व शिक्षक समितीचे अधिकारी- पदाधिकारी यांना साकडे
नळेगाव:(प्रतिनिधी बाळासाहेब बरचे) लातूर जिल्हा परिषेदे अंतर्गत कार्यरत असणाऱ्या एक हजार प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे निवडश्रेणी आणि वरिष्ठ वेतनश्रेणीचे प्रस्ताव गत एक वर्षापासून रखडले आहेत. काही शिक्षकांना या वेतनश्रेणीची प्रतिक्षा करता करताच सेवानिवृत्त व्हावे लागेल. वेतनश्रेणीस पात्र असणाऱ्या सर्व शिक्षकांचे प्रस्ताव विनाविलंब मंजूर करून यादी निर्गमित करण्याची मागणी शिक्षक सेना व शिक्षक समितीच्या वतीने लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुलजी केंद्रे, उपाध्यक्षा श्रीमती भारतबाई सोळुंके, मुख्यकार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे करण्यात आली. यादी मंजूर होत नसल्यास आंदोलनाचाही इशारा देण्यात आला. शिष्ठमंडळात शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष शरद हुडगे, शिक्षक सेनेचे बाळासाहेब येळापुरे, शिक्षक समितीचे चंद्रकांत भोजने, मुख्याध्यापक माधवराव बेल्लेवाड, पी .एस. सूर्यवंशी, संतोष गायकवाड हे उपस्थित होते.

0 Comments