महागाईने उतरतेय गँसची भुल,घराघरात पेटतेय पुन्हा चुल
महागाईत संसार वाटतेय खुराडे,गरीबीच्या घरात पेटतेय पुन्हा धुराडे
मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जगाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत असताना विविध संशोधन, शोध,विकास, सुखसुविधा याकडे प्रत्येक देशाची वाटचाल आहे.भारतासारख्या विकसनशील देशात डिजिटल इंडिया चे स्वप्न पाहणाऱ्या देशात ग्रामीण परिसरात अजूनही अनेक समस्या जशास तशा आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्वला गॅस च्या माध्यमातून प्रत्येक घर धुरमुक्त होण्यासाठी मोफत गॅस ची योजना उपलब्ध करून दिली. मात्र गॅसच्य किमती गगनाला भिडले असल्याकारणाने अजूनही ग्रामीण परिसरातील 45 टक्के स्वयंपाक चुलीवरच चालू असताना दिसतो आहे. ग्रामीण भागात गॅसचे दर 850 रुपये झाल्याने सर्वसामान्यांना हे दर परवडेल असे नाही. केरोसीन चा पुरवठा बंद केल्यामुळे घरातील स्टोव्ह, बंद झाल्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक झळ सोसावे लागते आहे. मात्र ग्रामीण भागातील आर्थिक बजेट कोलमडल्यामुळे स्वयंपाकासाठी लाकडे, तुराट्या वगैरे सरपण वर भर दिसतानाचे चित्र स्पष्ट झाले आहे.

0 Comments