महाराष्ट्र विद्यालय, निलंगा येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
निलंगा:(प्रतिनिधी/इरफान शेख) 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन, महाराष्ट्र विद्यालयात साजरा केला गेला. यावेळी अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पाचंगे आर.के., उपमुख्याध्यापक पवार डी.डी. आणि पर्यवेक्षिका श्रीमती देशमुख एस.डी. प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रथम सर्व प्रमुख अतिथीँनी सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर सर्व विज्ञान विषय शिक्षक, प्रयोगशाळा सहायक यांनी पुष्प वाहून प्रतिमा पूजन केले तसेच विज्ञान विषय शिक्षक मोहोळकर पी.एम.यांनी थोडक्यात विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले, त्यानंतर विज्ञान विभाग प्रमुख वाघमारे बी व्ही.यांनी आजच विज्ञान दिन का साजरा केला जातो. या विषयावर माहिती सांगितली. यावेळी सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांना शाळेचे मुख्याध्यापक पाचंगे आर. के. उपमुख्याध्यापक पवार डी.डी. व पर्यवेक्षिका श्रीमती देशमुख एस.डी. यांनी विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार बिराजदार आर. ए. यांनी केले.

0 Comments