उमरगा तालुका जमियत-उलेमा-ए-हिंद च्या अध्यक्ष पदी हाफिज़ अब्दुल रहमान तर सचिव पदी हाफिज़ यूसुफ शेख
उमरगा:(प्रतिनिधी/वजीर शेख) उमरगा तालुका जमियत-उलेमा-ए-हिंद च्या अध्यक्ष पदी हाफिज़ अब्दुल रहमान तर सचिव पदी हाफिज़ यूसुफ शेख यांची निवडी करण्यात आली जमियत-उलेमा-ए-हिंद या संघटना स्थापना स्वातंत्र्यपूर्व 19 नोव्हेंबर 1919 मध्ये झाली, देशाला स्वातंत्र्य मिळावे देश स्वतंत्र झाला पाहिजे ह्या हेतूने प्रेरित होऊन देशातील उलेमांनी एकत्र येऊन हि संघटना स्थापन केली व इग्रजा विरोधात लढा दिला, संघटनेचे मुख्य कार्यालय नवी दिल्ली येथे आहे स्वातंत्र्याचा इतिहास पाहता स्वातंत्र्य लढ्यात या संघटनेचे खूप मोठे योगदान व बलिदान आहे सध्या ही देशात सामाजिक सलोखा सामाजिक एकता टिकूण राहवी व देश एकसंघ होऊन राहून पुढे जावा या हि संघटना सदैव तत्पर असते देशात कुठेही आपत्ती आली तर हि संघटना देश सेवेसाठी हजर राहते उमरगा तालुक्यात हि मौलाना गुलामनबी बलसुरी यांनी सामाजिक व शैक्षणिक उपक्रम या संघटनेच्या माध्यमातून राबविले आहेत सध्या उमरगा तालुक्याचे ते कार्याध्यक्ष आहे या संघटनेचे उर्वरित तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष म्हणून मर्कज मस्जीद चे मौलाना अय्यूब, सहसचिव वजीरभाई शेख, कोषाध्यक्ष अब्दुल अजीजभाई खालीदी, सहकोषाध्य मौलाना शौकत मुरूमकर, सल्लागार अब्दुल हाकिम शेख, हाफिज़ सैफनसाब तर सदस्य हाफिज़ सज्जाद, मौलाना अब्बास, हाफिज़ अजहर, हाफिज़ सद्दाम, हाफिज़ साजिद, मौलाना सईद, हाफिज़ मोहसिन, हाफिज़ वसीम, मौलाना हारून, हाफिज़ सलीम, अब्दुल गनी हाफिज़ रियाज यांची सदस्य म्हणून नियुक्ति करण्यात आली या वेळी जिल्हा अध्यक्ष मौलाना इमरान, मुफ्ती रहेमतुल्ला यांच्या उपस्थित निवड करण्यात आली.

0 Comments