Latest News

6/recent/ticker-posts

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ.) पक्षाच्या वतीने मौजे साकोळ येथील पीडित कुटुंबीयांची भेट

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ.) पक्षाच्या वतीने मौजे साकोळ येथील पीडित  कुटुंबीयांची भेट 


देवणी:(प्रतिनिधी /विक्रम गायकवाड) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आ) पक्षाच्या वतीने मौजे साकोळ ता.शिऊरअनंतपाळ जि.लातूर येथील बौद्ध तरूणीची झालेली हत्या त्या संदर्भात आज दिनांक 23 मार्च 2021 रोजी पीडीत कुटुंबियांची भेट घेण्यात आली,यावेळी रिपाइं(आ) चे जिल्हा अध्यक्ष मा. देवीदासजी कांबळे साहेब,रिपाइं(आ)सोशल मिडिया आय.टी.सेल जिल्हा उपाध्यक्ष मा.गणेशभाऊ कांबळे दवणहिप्परगेकर,देवणी ता.अध्यक्ष मा.विलासजी वाघमारे,देवणी तालुका शहराध्यक्ष विक्रम गायकवाड, शिऊरअनंतपाळ ता.अध्यक्ष मा.मधुकरजी कांबळे,विठ्ठल गायकवाड,गजेद्र सुर्यवंशी,नागेश कांबळे,भानुदास सुर्यवंशी,साहेबराव सुर्यवंशी,पिंटू मादळे,रमेश सुर्यवंशी,संभाजी कदम,दयानंद वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते,या प्रकरणाची सखोल चौकशी करून हे प्रकरण जलदगतीने न्यायालयात चालवावे व सर्व आरोपींना तात्काळ कठोर शिक्षा झाली पाहिजे ही भुमिका रिपब्लिकन पक्षाची आहे असे जिल्हा अध्यक्ष मा.देवीदासजी कांबळे साहेब यांनी स्पष्ट केले यावेळी सामाजिक न्याय विभागातून मिळणारा निधी संदर्भात सामाज कल्याण आयुक्त यांच्याशी फोनद्वारे चौकशी करण्यात आली 1,00,000(एक लाख)निधी  कुटूंबियांना वितरित करण्यात आले असल्याचे आयुक्तांनी सांगितले,उर्वरीत  7लाखांचा निधीही लवकरच देण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले.या युद्धात रिपब्लिकन पक्ष तुमच्या सोबत ताकदीने उभा आहे आरोपीला जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत ही लढाई आपण लढू आंदोलन करण्याची वेळ आली तर तीव्र आंदोलन देखील करू परंतू आरोपींना कठोर शिक्षा झाल्याशिवाय रिपब्लिकन पक्ष स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments