Latest News

6/recent/ticker-posts

माळरानावर बहरला काजू, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने पारंपारिक शेतीला फाटा देत माळरानावर फुलवली काजूची बाग

माळरानावर बहरला काजू, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने पारंपारिक शेतीला फाटा देत माळरानावर फुलवली काजूची बाग


के.वाय.पटवेकर 

निटुर: हवामानाच्या लहरीपणामुळे सध्या शेती उद्योग तोट्यात आहे सततचा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी अन् गाराच्या मारामुळे शेतकरी सध्या मेटाकुटीला आला आहे माञ निलंगा तालूक्यातील खडक उमरगा येथिल शेतकऱ्याने  पारंपारिक शेतीला फाटा देत आपल्या शेतामध्ये तेही माळरानावर काजूची शेती करून लाखो रूपये उत्पन्न मिळवणार आहे त्यामुळे काजूची शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी येत असून या नविन प्रयोगाकडे अनेक शेतकरी आशेने पाहत आहेत. निलंगा तालूक्यातील खडक उमरगा येथिल शेतकरी विष्णू कदम यांनी आपल्या माळरानावर असलेल्या शेतामध्ये एक एक्कर काजूची लागवड केली आहे एक्कर भरामध्ये साधारणपणे दोनशे काजूची झाडे लावली आहेत  इ. स. 2016 मध्ये त्यांनी याची लागवड केली आहे. सुरूवातीला झाडे लहान असल्यामुळे यामध्ये त्यांनी आंतरपीक ही घेतले आहे माञ आता काजूची झाडे मोठी झाल्याने त्यामध्ये अंतरपीक घेता येत नसल्याचे कदम यांनी सांगितले. सध्या काजूचे झाडे मोठी आली असून एका झाडाला दहा किलो काजू चे उत्पादन होणार असून यामुळे लाखो रूपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे कदम यांनी  सांगितले. कोकणात येणारे हे पिक माळरानावर चांगल्या प्रकारे आल्याने शेतकरी आता या पिकाकडे आकर्षित होणार असल्याचे दिसते आहे. काजू लागवड ही अत्यंत सोपी असून बांधाच्या कडेला व माळरानावर कुठेही करता येते साधारणपणे वर्षामध्ये दोन तीन फवारणी केल्यानंतर हे पिक बहरते असेही कदम यांनी सांगितले एकूणच निलंगा तालूक्यामध्ये प्रथमच काजूची शेती होत असल्याने शेतकरी पाहण्यासाठी गर्दी करत यााआहेत.



Post a Comment

0 Comments