ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांच्या लेखणीतून...
अस्वस्थ मी..अबोल मी.
वाल्मी या संस्थेत कनिष्ठ अभियंता या पदाहुन निवृत्त झलेल्या विजय मेहंदळे आणि त्यांच्या पत्नीचा मृतदेह त्यांच्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडल्याच्या बातमीने औरंगाबाद अस्वस्थ झाले असले तरीही,ही बातमी मानवी मनाच्या संवेदनांचा विचार करायला लावणारी आहे..सकाळी ही बातमी वाचल्यापासून प्रचंड अस्वस्थ वाटत आहे..माणसा माणसांत असलेल्या भावभावनाना कुठे किंमत आहे की नाही असा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे..त्यांना एकुलती एक मुलगी असून ती अमेरिकेतून येण्यास असमर्थ असल्याने टीवनचे साडू डॉ.शरद भोगले यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याचे समजते,म्हणून त्या कुटुंबावर सामाजिक कार्यकर्त्यांनी अंत्यसंस्कार केले..जगण्याची धडपड करणाऱ्यांनी आणि प्रचंड कमावण्याच्या नादात आपलीच माणसे तोडणाऱ्या माणसांनी या बातमीला सतत डोळ्यासमोर ठेवून जगायला शिकले पाहिजे..आपण सगळी धडपड जगण्यासाठी करतो,गरजा अत्यंत कमी असतानाही जमवाजमवित आपलं आयुष्य घालवतो..जगण्याच्या धडपडीत चार माणसे जमवण्यातही आम्ही कमी पडतो..या सगळ्या बातमीचा सारांश इतकाच आहे की,आम्ही नेमके काय कमावले?आणि काय गमावले?
मध्यंतरी अशाच एका अंत्यविधीला जाण्याचा योग आला,त्या मातेची प्रॉपर्टी जिवंत असतानाच सगळ्यांनी वाटून घेतली आणि तिचा मृत्यू तिच्या बहिणीकडे झाला..अंत्यसंस्काला दहा माणसे,तिरडी कोण उचलायची यासाठी एकमेकांची तोंडे पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला..मीच म्हणालो,आम्ही देतो खांदा, चला घेऊन तेव्हा कुठे मार्ग निघाला..वाटणीला सगळे आणि अंत्यसंस्काराला पाहुणे असे चित्र पाहून त्या सगळ्याची कीव आली..रोज घडणाऱ्या घटना मनाला वेदना देणाऱ्या आहेत..म्हातारपणाला आधार असेल तर जगण्याला अर्थ आहे,अन्यथा मृत्यू सुद्धा व्यर्थ आहे..अनेक माणसे आज असे आयुष्य जगत आहेत..कुणाचाही आधार नसलेली ही मंडळी आज जगण्याचा आधार शोधत आहेत..अशी एखादी व्यवस्था निर्माण व्हायला हवी तिथे काठीचा आधार होता आले पाहिजे..काही काही वृद्धाश्रमात राहणाऱ्या जोडप्यांच्या आयुष्याच्या कहाण्या prachqnd अस्वस्थ करणाऱ्या आहेत..आई एकीकडे तर बाप दुसरीकडे विभागून सांभाळणाऱ्या पोरांनो आपण नेमके काय परत सुटलो आहोत..त्या दोघांनाही आगुष्याच्या शेवटी एकत्रित जगण्यासाठी जे करता येईल ते करायला हवे..त्यांची सेवा करण्यासाठी मुलात चढाओढ लागायला हवी..पण चित्र यापेक्षा गंभीर आहे..आजच्या घटनेने खरच मी प्रचंड अस्वस्थ झालोय..ज्यांचा वृद्धापकाळ आश्वस्थ नाही त्यांच्या आयुष्याचे काय?या प्रश्नांचा विचार नव्या पिढीने करायला हवा..
मेहंदळे काका आणि काकू खरच आम्ही असमर्थ ठरलो,आपल्या आयुष्याचा आधार बेकरीवाला आणि मेडिकलवाला झाला त्यांना सलाम..

0 Comments