चवळेवाडी नगरीतील आशा कार्यकर्त्या शिवनंदा चंद्रकांत चवळे यांची कामगिरी ठरली कौतुकास्पद
चवळेवाडी ग्रामस्थांनी घेतली Covid-19 लस,शिवनंदा चवळे यांनी पार पाडली मुख्य भूमिका
चाकूर:(तालुका प्रतिनिधी सलीमभाई तांबोळी) चवळेवाडी, पोस्ट शेळगाव ता. चाकुर येथील 60 वर्षांवरील सर्व नागरिकांनी covid 19 लस घेतली. भारत सरकारने 1 मार्च पासुन लस देण्याचे ठरवलेले असताना गावातील काही नागरिकांनी लस घेतली होती. मात्र काही वयोवृदध स्त्री- पुरुषांनी घेतली नव्हती. तेंव्हा आशा कार्यकर्त्या शिवनंदा चवळे यांनी पुढाकार घेऊन आज सर्व वयोवृद्ध नागरिकांना लसीचे महत्व पटवून दिले. आणि दि. २४ मार्च रोजी स्वतः चाकुर येथील ग्रामीण रुग्णालयात घेउन जाऊन लसीकरण केले. यांच्या कार्याचे कौतुक चवळेवाडी तसेच चाकुर तालुक्यातील ग्रामस्थ करत आहेत. ग्रामस्थांना ने आण करण्यासाठी विवेकानंद चवळे यांनी मेहनत घेतली.

0 Comments