निलंगा येथे पशु पक्ष्यांच्या कैवार्याने दाना-पाण्याची केली सोय
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) दि. २४ - उन्हांचा वाढता प्रमाण पाहता मुख्या प्राण्यांना पाणी पिण्याचा प्रश्न उदभवत असतो. आपण समाजच व प्राण्याचं देणं लागतो रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या तत्वावर चालणारे व उपजिल्हा रुग्णालय येते कार्यरत असणारे लक्ष्मण गजेंद्र फ़ुलसुंदर यांनी ज्वारी , तांदूळ , गहू व पाणी ठेहून मुख्या प्राणांची व्यवस्था केली आहे लक्ष्मण फ़ुलसुंदर यांच्या या उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे लक्ष्मण फ़ुलसुंदर मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत मागील 15 वर्षांपासून उपजिल्हा रुग्णालय येते कार्यरत आहेत. रुग्णांच्या सेवेत कधीच निष्काळजीपणा करत नाहीत त्यांना कधीही फोन करा लगेच हजर राहतात याबाबतीत त्यांची निलंगा शहरात विशेष ओळख आहे.

0 Comments