औसा शहरात चोरीचे सत्र सुरूच, एकाच रात्री अनेक ठिकाणी चोरी
पोलीस प्रशासन गंभीर नसल्याचा होतोय आरोप.
शेख बी जी
औसा: दि. २४ - शहरात २२ मार्च रोजी अवकाळी पावसाचा तडाखा चालू असताना शहरात हाश्मी नगर व बरकत नगर या ठिकाणी रात्री चोरी झाली. दोन्ही ठिकाणी झालेल्या चोरीच्या ठिकाणावरून असे दिसते की चोरी करणारे या घरावर पाळत ठेवून होते .घरात कोणी नसल्याचे पाहून दोन्ही ठिकाणी एकाच वेळी चोरी केली. बरकत नगर येथील चांद फतरू शेख हे आजारी असल्याने लातूर या ठिकाणी उपचारासाठी गेले होते. चोरांनी गेटचे लॉक तोडून व मुख्य दरवाजाचे लाॅक तोडून घरात प्रवेश केला. दोन मजली घरातील दोन्ही कपाट तपासले दोन्हीही कपाट तुटलेल्या अवस्थेत आढळून आले. चांद शेख यांच्या घरातून साडेचार तोळे सोने 22 हजार रोख रक्कम चोरली. मागील अनेक दिवसांपासून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आशा चोऱ्या घडून येत आहेत. मात्र पोलीस प्रशासन या बाबीकडे गांभीर्याने घेत नसल्याचे शहरात बोलले जात आहे. चोरीचे सत्र सतत चालू असल्याने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

0 Comments