Latest News

6/recent/ticker-posts

तेरणा परिसरात अवैध वाळू उपसा जोमात संबंधित अधिकारी मात्र कोमात

तेरणा परिसरात अवैध वाळू उपसा जोमात संबंधित अधिकारी मात्र कोमात


मदनसुरी:(प्रतिनिधी/द्रोणाचार्य कोळी) निलंगा तालुक्यातील कोकळगाव सह परिसरात तेरणा नदीच्या परिसरातूनच मागील दहा महिन्यापासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असून ,वाळू माफिया मालामाल, अन संबंधित अधिकारी लालेलाल होत असतानाचे बोलले जाते आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोकळगाव सरवडी,आदी परिसरात तेरणा नदीच्या काठी शेतात काळी माती टाकण्याच्या अनुशंगाने  हजारो ट्रॅक्टर्स वाळू उपसा होतो आहे. सदर वाळू उपसा राजरोजसपणे दिवसा अन रात्री कोणाचीही भीती न बाळगता होतें आहे. याकडे आजपर्यंत कोणत्याही संबंधित अधिकारी याने कारवाईचा बडगा केलेला नसल्याकारणाने वरिष्ठ अधिकारी ते तलाठी लेव्हल सर्वच साजेमुगे असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यामुळे शासनाचे करोडो रुपयांचा महसूल प्रशासनाच्या तिजोरीत न जाता संबंधित अधिकाऱ्याच्या खिशात जातो की काय अशी शंकाही व्यक्त करण्यात येते आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना कोणाचा आशीर्वाद आहे असाही सवाल स्थानिकाद्वारे करण्यात येते आहे. काही वाळू माफियांनी ट्रॅक्टरच्या संख्यात वाढ करून बेभाव पणाने परिसरात वाळू विकण्याचा गोरख धंदा सर्रास पणाने चालू आहे ,याकडे कोणाचे अंकुश असणार का ? असा प्रश्न निर्माण होतो आहे. सकाळ संध्याकाळ, दुपार,दिवसा अन रात्री फक्त आणि फक्त वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरांचाच ताफा रस्त्या रस्त्यांनी,चौका चौकातून वर्दळ करीत असतानाचे स्पस्ट चित्र दिसते आहे. अशा या अवैध धंद्यांना शह देणाऱ्या अधिकाऱ्याच्या प्रशासन मुसक्या अवळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments