नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्ड लसीकरणास वेग वाढला
नळेगाव:(प्रतिनिधी/बाळासाहेब बरचे) दि. 24 - जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे आरोग्य विभागाकडून कोविशिल्ड लसीकरण मोहिमेस वेग नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंदात दिसून येत आहे. कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिवसेंदिवस नियम कडक केले जात आहेत.त्याच बरोबर विनामास्क फिरू नका,फिजिकल डिस्टन्स राखा,गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका,वारंवार हात स्वच्छ धुवा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या प्राथमिक आरोग्य विभागातर्फे हेल्थ वर्कर म्हणून 59 आशा,11 एन एम,6 एन पी डब्लु,2 जी एन एम,3 मेडीकल ऑफिसर,4 सेवक,2 बी एफ,सातशे सि एच ओ,1 लॅब टेकनिशन,औषध निर्मन अधिकारी व तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या आणि फ्रंटलाईन वर्कर म्हणून शिक्षक,पोलीस,ग्रामसेवक,तलाठी आदिजन सेवा देत आहेत. 8 मार्च पासून या कोविशिल्ड लसीकरणास सुरुवात करण्यात आली.सध्या नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देत असलेल्या कोविशिल्ड लसीकरणास वेग आलेला दिसत असून आरोग्य विभागात उपलब्ध असलेल्या 1100 लसी पैकी आतापर्यंत 753 लसी 45 ते 59 वयोगटातील व्यक्तींना लसीकरण करण्यात आले असून आणखी पुढील येणाऱ्या व्यक्तींना लसीकरण करण्यास सुरुवात आहे.

0 Comments