Latest News

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती संबंधित शाळेशी संपर्क साधावा

विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती संबंधित शाळेशी संपर्क साधावा


लातूर:(जिमाका) दि.1 - सन 2017-18, 2018-19 मधील खरीप हंगामातील / दुष्काळग्रस्त भागातील इ.10 वी, इ.12 वीच्या परीक्षा शुल्क माफीस पात्र तथापि अद्याप परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती झालेली नाही,अशा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या / पालकांच्या -आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा. सन 2019-20 मधील अवेळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील इ.10 वी व इ.12 वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या कार्यवाहीसाठी संबंधित माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा. याबाबतची तपशीलवार माहिती मंडळाच्या http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर इ.10 वीसाठी http://feerefund.mh-ssc.ac.in व इ.12 वीसाठी http://feerefund.mh-hsc.ac.in हया लिंकवर प्रसिध्द करण्यात आली आहे असे सचिव राज्य मंडळ, पुणे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

Post a Comment

0 Comments