केळगाव पाटीवर आज दुपारी दुचाकीस्वाराचा समोरासमोर अपघात होऊन दोन गंभीर जखमी
केळगाव:(प्रतिनिधी/वसीम मुजावर) निलंगा तालुक्यातील केळगाव पाटीवर बारा वाजता दोन दुचाकीस्वाराचा समोरासमोर अपघात होऊन दोन जण त्यात गंभीर जखमी झाले आहेत
निलंगा तालुक्यातील केळगाव पाटी पासून 300 मीटर अंतरावर दोन दुचाकीस्वाराचा अपघात होऊन दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
जहिराबाद ते लातूर या नवीन होत असलेल्या महामार्गावर हा अपघात झाला आहे अपघातात जखमी झालेले किरण मोहन लोहार 28 राहणार अंबुलगा बुद्रुक तर दुसरा अपघात झालेला युवक हा नळेगाव तालुका चाकूर येथील असल्याचे वृत्त हाती येत आहे. केळगाव येथील स्थानिक नागरिकांनी व शेतकऱ्यांनी 108 या रुग्णवाहिकेला संपर्क करून त्या दोन जखमींना उपचारासाठी निलंगा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दोघांनाही जबर मार लागल्याने दोघेही गंभीर जखमी आहेत.

0 Comments