औसा नगरपालिकेत प्रथमच महिला उपनगराध्यक्ष पदी निवड
लातूर:(जिल्हा प्रतिनिधी बी/जी शेख)दि.१ औसा नगरपालिकेत प्रथमच महिला उपनगराध्यक्ष तत्तापुरे जहाँआरा गौसपाशा यांची निवड झाली आहे. एक मार्च रोजी विशेष सभा संपन्न झाली . सभेमध्ये नवीन उपनगराध्यक्ष यांची निवड करण्यात आली. या सभेचे अध्यक्ष तथा पीठासन अधिकारी लोकनियुक्त नगराध्यक्ष अफसर शेख हे होते. या सभेला एकूण १९ नगरसेवक उपस्थित होते. या निवडीसाठी दोन उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये उन्मेश वागधरे व तत्तापुरे जहांआरा या दोघांचा अर्ज वैध ठरवण्यात आला. त्यानंतर मतदानाची प्रक्रिया हात वर करून घेण्यात आली. यामध्ये चार मते उन्मेश वागधरे यांना मिळाली तर १४ मते तत्तापुरे यांना मिळाली. मोमीन समाज हा सुरुवातीपासूनच इतक्या मोठ्या पदापासून वंचित राहिला होता. त्यांना असे पद देऊन नगराध्यक्ष शेख यांनी सर्वांची मने जिंकली आहेत. औश्याच्या इतिहासातील महिला उपनगराध्यक्ष ही पहिली घटना असल्याने नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे आभार व्यक्त केले जात आहेत.

0 Comments