नितेश राणे यांच्यावर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करा - युवा सेनेची मागणी
निलंगा:( तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्यावर नितेश राणे यांनी गंभीर आरोप केल्याबद्दल त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली. सचिन वाझे यांच्याकडून युवासेना सचिव वरून सरदेसाई यानी पैसे मागितले असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे. युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या राजकीय व वयक्तिक जीवनावर नितेश राणे यांनी बिनबुडाचे गंभीर आरोप केले आहेत. याचा निषेध म्हणून युवासेना निलगा यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी विकासजी माने यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना युवा सेना उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे, युवा सेना तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे, प्रसाद मठपती, सतिश रुपनर, किशोर स्वामी, अजय वावरे, आयुब शेख, दिपक जाधव, किरण पाटील, अभिजीत लांडगे, आदित्य वाघमोडे, जगदीश पाटील, प्रशांत पेदे, चैतन्य बिराजदार, श्रीनिवास भोसले, अमित चव्हाण, गोपाल हिबारे, सतीश धायगुडे, बजरंग कांबळे, रवि नागरसोगे, सावंत आदीसह इतर शिवसैनिक उपस्थित होते.

0 Comments