Latest News

6/recent/ticker-posts

कोळेवाडीतील खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप; दहा हजार रुपये दंडाची शिक्षा

कोळेवाडीतील खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप; दहा हजार रुपये दंडाची शिक्षा


औसा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

लातूर:(जिल्हा प्रतिनिधी/बि डी उबाळे) औसा तालुक्यातील कोळेवाडी येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून झालेल्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, कोळेवाडी तालुका औसा येथील 25 वर्षीय युवक तुषार अरविंद सर्जे याचे आरोपीच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीस आल्याने दिनांक 21 डिसेंबर 2019 रोजी दुपारी तीनच्या सुमारास आरोपीने तुषार अरविंद सर्जे याच्या पोटात चाकू खुपसला या घटनेत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी औसा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीचा शोध घेऊन आरोपी विरुद्ध भादवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस अधीक्षक लातूर,उपविभागीय पोलिस अधिकारी औसा,अपर पोलीस अधीक्षक लातूर, पोलीस निरीक्षक औसा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल बहुरे यांनी गुन्ह्याचा तपास केला होता. गुन्ह्याच्या अनुषंगाने सबळ पुरावे हस्तगत करून पोलिसांनी दिनांक 19 मार्च 2020 रोजी दोषारोप पत्र दाखल केले होते. सदर खटल्याची खटला क्रमांक 57/ 2020 कलम 302 प्रमाणे जिल्हा व सत्र न्यायालय लातूर येथे सुनावणी होऊन साक्षी पुरावे दिनांक 18 मार्च 2021 रोजी पूर्ण करण्यात आले. सदर घटनेत एक वर्षात निकाल देण्यात येऊन आरोपी बालाजी फुलचंद सर्जे वय 22 वर्षे राहणार कोळेवाडी ता. औसा यास जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा दिनांक 24 मार्च 2021 रोजी सुनावण्यात आली. शासनाच्या वतीने ऍड संतोष देशपांडे यांनी काम पाहिले दहा साक्षीदार या घटनेत तपासण्यात आले होते कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस अंमलदार विजया पकाले यांनी तर समन्स कामकाज पोलीस अंमलदार म्हणून ईश्वर व्यवहारे यांनी काम पाहिले. अनैतिक  संबंधाच्या संशयावरून यावरून झालेल्या खून प्रकरणी दोषारोप पत्र पत्र दाखल होऊन खटल्याचा निकाल एक वर्षाच्या आत देऊन आरोपीला जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आल्याने या घटनेबाबत औसा तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.

Post a Comment

0 Comments