Latest News

6/recent/ticker-posts

वडमुरंबी ग्रामस्थांच्या वतीने जि.प.कें.प्रा.शा.वडमुरंबी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

वडमुरंबी ग्रामस्थांच्या वतीने जि.प.कें.प्रा.शा.वडमुरंबी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


देवणी:( प्रतिनिधी विक्रम गायकवाड ) गावक-यांच्या वतीने शाळेतील विविध स्पर्धांमध्ये उत्तीर्ण झालेल्याविद्यार्थ्यांचा यात शिष्यवृत्ती परिक्षेत तालूक्यातून मुलांत सर्व प्रथम आलेला सुमीत मुर्गे,तालूकास्तरावरुन घेण्यात आलेल्या चिञकला स्पर्धेत दीपाली बिजापुरे,टॕलेंट हंट स्पर्धेत प्रथम आलेली आदिती पाटील व द्वितीय आलेली पवार अंकीता या सर्व विद्यार्थ्यांचा गावक-यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व गावक-यांनी शाळेतील सर्व उपक्रमांचे नियोजन पाहून समाधान व्यक्त करत सर्व शिक्षकांचे कौतुक केले. शाळेतील प्रत्येक यशासाठी गावची व अधिका-यांची सकारात्मक भूमिका असणे गरजेचे आहे असे मत यावेळी आवर्जून उपस्थित असलेले बंडु गुरुजी यांनी व्यक्त केले याच बरोबर वडमुरंबी गावचे नवनियुक्त उपसरपंच सौ.श्रीदेवी बिरादार यांचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. शाळेचे शिक्षक रणदिवे पी.बी.यांची देवणी तालूक्याच्या प्रोटान संघटनेच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मु.अ निलेवाड सर,सरपंच भिंगे साहेब, पञकार मुर्गे, अण्णाराव बिजापूरे सर्व शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments