Latest News

6/recent/ticker-posts

केदारपुर मोडवर कार व दुचाकीच्या अपघातात आंबुलगा बु.येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

केदारपुर मोडवर कार व दुचाकीच्या अपघातात आंबुलगा बु.येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू


केळगाव:( प्रतिनिधी/वसीम मुजावर ) रात्री अंदाजे 8:30 वाजता निलंगा तालुक्यातील केदारपुर मोडवर दुचाकीस्वाची व कारची जोराची धडक झाल्याने आंबुलगा येथील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर वृत्त असे की निलंगा तालुक्यातील आंबुलगा येथील युवक जाफर मदार साहेब मुल्ला वय 22 वर्ष हा रात्री आठ वाजता अंबुलगा बू.वरून निलंगा येथे दुचाकी एम एच 48 बीजी 30 55 या स्कुटी गाडी वरून निलंगा येथे जात होता. जात असताना अंबुलगा गावापासून चार किलोमीटर अंतरावर उदगीर निलंगा महामार्गावर केदारपुर मोड जवळ रस्त्याच्या बाजूला उभी असलेल्या एम एच 14 सी. एक्स.55 38 झायलो  चार चाकी कारला मागून जोराची धडक दिल्याने मोठा अपघात झाला व जबर मार लागल्याने दुचाकीस्वाराचां जागीच मृत्यू झाला आहे. पोलीस निरीक्षक व हेडकॉन्स्टेबल यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मयत तरुणाचे शव उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे पोस्टमार्टमला पाठवण्यात आले. मृत्यूची नोंद निलंगा पोलीस स्टेशन येथे करण्यात आली आहे. या अपघाती झालेल्या निधनामुळे संपूर्ण अंबुलगा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments