Latest News

6/recent/ticker-posts

मामाच्या गावी आलेला विशाल बिराजदारची अखेर प्राणज्योत मावळली;महावितरणच्या गलथान कारभारामुळे चिमुकल्याचा मृत्यू

मामाच्या गावी आलेला विशाल बिराजदारची अखेर प्राणज्योत मावळली;महावितरणच्या गलथान कारभारामुळे चिमुकल्याचा मृत्यू 


निलंगा
:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख ) तालुक्यातील धानोरा गावात झुकलेल्या तारांचा स्पर्श लागून मामाच्या गावी आलेला चि.विशाल बिराजदार हा 14 वर्षांचा चिमुकला 60% भाजलेला होता त्याचा उपचार लातूर येते सुरू होता मागील 2 -3 दिवसांपूर्वीच रुग्णालयात जाऊन औसाचे आ.अभिमन्यू पवार यांनी विशालच्या तब्येतीची चौकशी करून डॉक्टरांशी चर्चाही केली होती. दुर्दैवाने विशालचा मृत्यू झाला. विशालचा मृत्यू हा महावितरणच्या गलथान कारभारानं घेतलेला बळी आहे. मागच्या 18 महिन्यांपासून या तारा झुकलेल्या आहेत, शेतमालकाने वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. आमदार अभिमन्यू पवार यांनी थेट घटनास्थळी जाऊन पुन्हा एकदा प्रशासनाला पंचनामे करायला लावून या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व विशालच्या कुटुंबियांना मदत मिळवून द्यावी असे निर्देश आ.पवार यांनी दिले. यावेळी उपस्थित उपविभागीय अधिकारी विकास माने,तहसीलदार गणेश जाधव , गोविंद जाधव, बबर जाधव व गावातील नागरिक व शेतकरी उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments