रूग्णांच्या मदतीला धाऊन जाणारे माझं लातूरचे रक्तदाते
लातूर: माझं लातूर या व्हाट्सऍप परिवाराचे सर्व सदस्य "माझं लातूर - माझी जबाबदारी" या जाणीवेने प्रेरित होऊन कार्य करीत असल्याचा अनुभव पुन्हा एकदा आला. माझं लातूर परिवारातील सर्व सदस्य कोणालाही कशाची गरज पडलीकी पटकन मदतीला धाऊन जातात याचंच हे उदाहरण. शहरातील एका बाल रुग्णालयात ५ वर्षाच्या राजवीर गुरव या बालकावरा उपचार सुरू आहेत. त्याच्या शरीरातील पांढऱ्या पेशा कमी झाल्या असल्याने, डॉक्टरांनी पांढऱ्या पेशा चढवाव्या लागतील असे सांगितले. गुरव परिवार हे मुळचे उमरगा या गावचे इथे कोणी ओळखीचे नाही. लॉकडाऊन असल्याने बाळासाठी लागणाऱ्या पांढऱ्या पेशांसाठी कुटुंबातील सदस्य ब्लड बँकात फीरले, प्रत्येकजण डोनर आणा म्हणून सांगू लागला. या पेशीच्या शोधात ते माऊली ब्लड सेंटर वरती आले. कौंऊटरवर डॉक्टरांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन दाखवले. तंत्रज्ञ शिवाणी गायकवाड मॕडम यांनी ते बघीतले व लगेच डॉ सितम सोनवणे यांना फोन करून बी पाॕझीटीवचा डोनर मिळेलका ५ वर्षाचं बाळ आहे आणि एसडीपी लागणार आहे म्हणून सांगितले. काही दिवसापुर्वीच वाढदिवसानिमित्त प्लाझमा डोनेशन करायला आलेले माझं लातूरचे अॕड सुनिल शेंडगे सर बी पाॕझीटीव असल्याचे माहीत होते. त्यांच्याशी फोनवर बोलनं झालं सर पाच मिनीटात माऊली ब्लड सेंटरला पोहोचतो असे बोलले. तोपर्यंत डॉ सोनवणे यांनी त्याबाळाच्या नावाचा मेसेज तयार केला आणि माझं लातूर या सामाजिक ग्रूपवर टाकला. काही मिनिटांत राजेश तांदळे यांचा फोन आला सर मी एसडीपी डोनेशन करायला तयार आहे. राजेश तांदळे आणि अॕड सुनील शेंडगें सर दोघेही ब्लड बँकेत हजर. दोघांच्या आवश्यक असलेल्या ब्लडच्या चाचण्या झाल्या. त्यात राजेश तांदळे पात्र डोनर ठरले कसलाही विलंब न करता बाळासाठी एसडीपी (पांढऱ्या पेशी) डोनेट केल्या. यावेळी बाळाचे आजोबा राजेश यांच्याशी बोलत होते, मुलाचे वडील कामानिमित्त दुबईला आहेत. बाळाच्या आजारपणाने आम्ही घाबरलो पण तुम्ही देवासारखे धाऊन आलात. तुमची ही मदत आम्ही कधीही विसरू शकणार नाहीत. असे एका मेसेजवर, फोनवर धाऊन येणाऱ्या रक्तदात्यांना सलाम. राजेश तांदळे आणि अॕड. सुनील शेंडगे या माझं लातूर परिवारातील सन्माननीय सदस्यांनी रक्तदान चळवळ गतिमान केल्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन.
0 Comments