पत्रकार रवींद्रसिंघ मोदी यांच्या ट्वीट मुळे मध्यप्रदेश मधील शिखलीगर समाजाला मिळाली मदत
नांदेड:(प्रतिनिधी) दि. 27 मे मध्यप्रदेश मधील खरगौन जिल्ह्यातील धूलकोट गावातील भुकेशी संघर्ष करीत असलेल्या गरीब शिखलीगर समाजाच्या 50 कुटुंबाना नांदेडचे पत्रकार स. रवींद्रसिंघ मोदी यांच्या ट्वीट मुळे नुकतीच मदत पोहचली आहे. त्यामुळे धुलकोट गावातील शिखलीगर समाजाने रवींद्रसिंघ मोदी यांचे आभार मानले आहेत. वरील विषयाची माहिती अशी कि मध्यप्रदेशच्या ग्रामीण भागात मोठ्या संख्येत गरीब शिखलीगर समाजाचे वास्तव्य आहे. असंख्य कुटुंब चाकू, छुरी, तवा, कडची, स्टोव, चिमटा तयार करून आणि ते विकून जीविका भगवतात. अनेकजण मजूरीसाठी ही जातात. पण मध्यप्रदेश मध्ये कोविड परिस्थितीमुळे लॉकडाउन असल्याने कुठे जिल्हाबंदी तर कुठे गांवबंदी सुरु आहे. यामुळे अनेक महिन्यापासून शिखलीगर समाजाचे काम, रोजगार, व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. यामुळे शिखलीगर समाजाची चांगलीच कोंडी झाली आहे. अशात व्हाट्सप्प वर एक वीडियो वायरल झाला. खरगौन जिल्ह्यातील धूलकोट गावचा तो वीडियो होता ज्यात काही कुटुंब त्यांची अडचन सांगून रेशन सामग्रीसाठी विनंती करीत होते. वरील वीडियो पत्रकार रवींद्रसिंघ मोदी यांनी दि. 20-05-2021 रोजी ट्वीटर वर वायरल करून गरीब शिखलीगर समाजाला मदत करण्याची विनंती जोडली होती. ट्वीट मध्ये एसजीपीसी संस्था, मध्यप्रदेश मधील शीख संस्था, गुरुद्वारा कमेटी आणि सेवाभावी लोकांना ट्याग केले होते. तसेच मध्यप्रदेश येथील स. मोनूसिंघ स्व. गुरदीपसिंघ भाटिया आणि गुरुद्वारा कमेटीचे स. रिंकूसिंघ भाटिया यांच्याशी संपर्क साधून खरगौनच्या शिखलीगर समाजाला मदत करण्याची विनंती केली होती. रवींद्रसिंघ मोदी यांच्या ट्वीटला चांगलाच प्रतिसाद मिळाला आणि शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमेटीच्या अध्यक्षा बीबी जगीरकौर यांनी फोन वर रवींद्रसिंघ मोदी यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली आणि आश्वासन दिले की लवकरच एसजीपीसी तर्फे पाउले उचलण्यात येतील. यानंतर पटना बिहार गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष स. सूरजसिंघ नलवा, स. रणजीतसिंघ सलूजा आणि स. मोनुसिंघ भाटिया यांनी रवींद्रसिंघ मोदी यांच्याशी वार्तालाप करून मदतीसाठी पुढाकार घेतला. बिहार गुरुद्वारा कमेटीने संपूर्ण खर्च वहन करण्याचा निर्णय घेतला. येथून बिहार गुरुद्वारा कमिटीचे जनसम्पर्क अधिकारी व मीडिया प्रमुख परमीत सिंघ बग्गा हे संपर्क साधून होते. तसेच एसजीपीसी तर्फे युवराज भूपिंदरसिंघ देखील संपर्क साधून होते. दिल्ली गुरुद्वारा कमेटीचे माजी अध्यक्ष परमजीतसिंघ सरना यांनी देखील मोदी यांच्या ट्वीट वर मदतीची तयारी दर्शवली होती. तर अनेक सेवाभावी नागरिकांनी पत्रकार मोदी यांच्या ट्वीटला री-ट्वीट करून मदतीसाठी हाक दिली होती. इंदौर येथून धूलकोट गांव 180 किलोमीटर अंतरावर आहे. लॉकडाउन परिस्थितिमुळे स. मोनुसिंघ भाटिया आणि त्यांच्या चमुने शासन परवानगी मिळवून एक गाडीभर रेशन सामग्री आणि जीवनावश्यक वस्तुंचे वितरण केले. पन्नासहून जास्त कुटुंबांना यावेळी मदत मिळाली असून येत्या दोन महिन्याचा त्यांच्या जीविकेचा प्रश्न सुटला आहे. यामुळे सर्व शिखलीगर समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. नंतर धूलकोट गावातील शिखलीगर समाजाने पुन्हा एक वीडियो वायरल करून मदतीसाठी धावून येणाऱ्या एसजीपीसीच्या अध्यक्षा बीबी जगीरकौर आणि इतरांचे आभार मानले आहे. शेवटी वीडियो लोकांपर्यंत प्रसारित केल्यामुळे पत्रकार रवींद्रसिंघ मोदी यांचे आभार मानले आहे.
0 Comments