Latest News

6/recent/ticker-posts

निराधारांना दिला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आधार

निराधारांना दिला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आधार


चाकुर:{ता.प्र.सलीमभाई तांबोळी} कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता. निराधारांना त्यांचे अनुदान वाटप करण्यात अडचण होत होती. शासनाच्या नियमांचे पालन होत नव्हेत सोशल डिस्टन्सिंग पालन होत नव्हते एकदाच अनुदान उचलण्यासाठी निराधारांची गर्दी पडत होती. चाकुर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत सजंय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग व्यक्तीचे आनुदान, विधवा, परितक्या, अशा जवळपास ६०० ते ७०० निराधार आनुदानासाठी पाञ आहेत. निराधारांची होणारी पगारीसाठीची अडचण चाकुर शहरातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते व पदअधिऱ्यांच्या निदर्शनास आली. बँकेत महाविकास आघाडीचे नेते करीम गुळवे सांगायो अध्यक्ष, विलास पाटील भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पार्टी चाकुर तालुकाअध्यक्ष, शेख हुसेन पप्पुभाई शहरध्यक्ष संगायो सदस्य चाकुर, गणेश फुलारी शहरध्यक्ष राष्ट्रवादी, सय्यद इलियास नगरसेवक, भागवत फुले युवक जिल्हा सरचिटणीस लातुर, अंगद पवार शिवसेना जिल्हाउपाध्यक्ष, बाळु जाधव शहर अध्यक्ष शिवसेना, सलीमभाई तांबोळी सोशल मिडीया सेल प्रमुख, बिलाल पठाण शहर अध्यक्ष युवक राष्ट्रवादी, बाळु इरवाने, विजय धनेश्वर, मतीन गुळवे, तौफीख शेख, उमरफारुक शेख, आदिच्या पुढाकाराने बँक मॕनेजर यांच्याशी चर्चा करुन सर्वाच्या सहकार्यने निराधारांच्या पगारीसाठी होणाऱ्या अडचणीवर चर्चाविनिमय करुन तोडगा काढण्यात आला. आज चाकुर जिल्हा मध्यवर्ती बँका समोर निराधांराची गर्दी होती. सर्वाच्या जवळील पासबुक घेऊन सिलिंप भरण्यात आली व covid-19 च्या नियमाचे पालन करत निराधारांच्या पगारीसाठी येणाऱ्या लोकांना ऊन लागु नये म्हणून बँकेसमोर दोन शामियाने टाकु सावली करण्यात आली व त्यांच्यासाठी पिण्याच्या पाणीची व्यवस्था करण्यात आली निराधाराना आता आपले अनुदान उचलण्यासाठी बँकेचे खेटे मारण्याची आवश्यकता नाही. दररोज अनुदान उचलण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक पाञ व्यक्तीना अनुदान मिळणार आहे. निराधारांच्या अनुदान वाटप आता व्यवस्थित होणार आहे. वृध्द व्यक्तीना अनुदान उचलण्यासाठी येणारी अडचण सोडविल्यामुळे सर्वच महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते यांचे आभार पगारीसाठी आलेल्या निराधार लोकांनी मानले व त्यांच्या  पगारीसाठी नियोजन केल्याबदल समाधान व्यक्त केले.

निराधार व्यक्तीच्या  पगारीसाठी यापुढे कोणतीच अडचण येणार नाही. सर्वाना अनुदान मिळेल.सर्वानी व्यवस्थित व गर्दी न करता शासनाच्या नियमांचे पालन करुन आपले अनुदान उचलावे.निराधाराना आपले अनुदान उचलताना अडचण आली तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा अनुदान मिळण्यासाठी अॉटो मधुन संपूर्ण शहरात आहवान करण्यात आले आहे.कोणत्याही पाञ व्यक्तीनी खाजगी व्यक्तीकडे पासबुक देऊ नये बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुचना करण्यात आली आहे तरी अनुदान उचलताना अडचण येणार नाही- करीम गुळवे, संगायो अध्यक्ष चाकुर

आमचे नेते लातूर जिल्हा बॅंकेचे मुख्य प्रवर्तक माजी मंत्री महाराष्ट्र राज्य दिलीपराव देशमुख आणि जिल्हा बॅंकेचे संचालक आमदार बाबासाहेब पाटील यांनी निराधारांना पगार उचलण्यासाठी अडचण होऊ नये म्हणून पाञ निराधारांना या कोरोणा काळात नियमांचे पालन करुण पगार करा अशी सुचना केली आहे. त्यांच्या सुचनेप्रमाणे चाकुर जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन निराधारांची अनुदान उचलण्यासाठी होणारी अडचण लक्षात घेऊन त्यावर उपाय म्हणून निराधाराना वेळेवर अनुदान मिळावे म्हणून नियोजन केले बँकेत येणाऱ्या पाञ व्यक्तीचे पास बुक व सिलिप भरुन देऊन बँक कर्मचारी कडे देण्याची व्यवस्था केली व येणाऱ्या काळात मराठी बाराखडी  अक्षर प्रमाणे लाभार्थी यांच्या आडनाव प्रमाणे आठवड्यात तील दिवस निवड करून त्या त्या दिवशी त्या लाभार्थी यांना पगार करण्यासाठी बँक अधिकाऱ्यांना विनंती केली आहे या नियोजनामुळे पगारीसाठी येणाऱ्या निराधारांना अनुदान उचलण्यासाठी अडचण येणार नाही आणि गर्दी पण होणार नाही- विलास पाटील,भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पार्टी चाकुर तालुका अध्यक्ष

Post a Comment

0 Comments