Latest News

6/recent/ticker-posts

सरदारवाडी ते देवीहल्लाळी शिव रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सरदारवाडी ते देवीहल्लाळी शिव रस्त्याने घेतला मोकळा श्वास


पावसाळ्यात शेतक-यांचे जाणे येणे साठी रस्ताच नव्हता

कासार बालकुंदा: निलंगा तालुक्यातील  सरदारवाडी  ते देवीहल्लाऴी शिव दोन किमीच्या शेतरस्त्याचे मातीकाम पुर्ण झाले असुन गत 60 वर्षापासुन असलेली शेतक-यांची मागणी पुर्ण होऊन या  रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. या शिवारातील जवळपास 60 ते 70 शेतकरी शेताकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करत होते परंतु रस्ता नसल्या शेतातुन धान्याची रास आणायचे असेल तर दुसर्याच्या शेतातुन जावे लागत असत. शेतातुन गुडघाभर चिखल होत असल्याने पावसाळ्यात गाई,बैल व म्हशींना शेतातच बांधावे लागत असे. चिखल कमी होईपर्यत शेतातच सोयाबिन, उडीदाच्या बनमी कुजुन जात असत. या रस्त्याने जळण, चारा घेवुन चालता येत नव्हते तसेच म्हातारी माणसाना तर शेत येईपर्यत चार वेऴेस बसत बसत जावे लागत असत. जनावरांना चारा पाणी करण्यासाठी पावसाळ्यात पायात चप्पल बुट हातात धरुन गुडघाभर चिखलातुन शेतातुन जावे लागत असल्याने या शिवारातील शेतकरी बांधव वैतागुन गेले होते. मोटार सायकल देखील जात नसल्याने खत, बी पेरणीसाठी 10-20 किलोनी डोक्यावर न्यावे लागत. रस्ता नसल्याने पेरनिला बैलकरी वेळेवर येत नसत. काहीजण तर रस्ता शेताला नाही म्हणुन शेतात नगदी पिकाचे, भाजीपालाचे उत्पन्न घेत नव्हते. शेताकडे जाण्यास रस्ता नसल्याने या शिवारातील शेतकरी शेतात पाणी असुनही ऊसाची लागवड करत नव्हते त्यामुळे  शेतरस्ता व्हावा यासाठी शेतक-यांनी अनेकदा प्रयत्न केले. यापुर्वि 60 वर्षापासुन मागणी करुनही हा रस्ता न झाल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. गावातील शेेतक-यांची ही व्यथा. सरदारवाडी येथिल समाजसेवक पांडुरंग मोरे यांनी पुढाकार घेवुन व प्रशासनाकडे पाठपुरावा करुन हा 60 वर्षापासुनचा रखडलेला हा रस्ता पुर्ण करुन घेतले. हा रस्ता पुर्ण होईपर्यत स्वत: पाडुरंग मोरे शेतकर्याच्या अडचणी सोडवत, समजावुन सांगुन रस्ता पुर्ण केले. आपल्या मतदारसंघातील शेतक-यांना रस्त्याअभावी होत असलेला ञास पाहुन स्थानिक आमदार निधीतुन शेतरस्ते,पाणंदरस्ते व शिवरस्ते बनविण्यासाठी एक वेगळाच पॅटर्न राबविण्याचे कार्य आ.अभिमन्यु पवार यांनी याचवेळी हाती घेतले होते. महीन्यापुर्वी भुमिपुजण केले होते. गेल्या अनेक वर्षापासुन शेतक-यांची असलेली रस्त्याची मागणी पुर्ण होऊन जवळपास दोन किलोमीटर रस्त्याचे मातीकाम पुर्ण झाले असुन पावसाळ्यात शिवारातील पाणी  आणण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजुस नालाही घेण्यात आले आहे.  या रस्त्यास आमदार निधीतुन प्रतिकिमी 44 हजार मिळाले असुन उर्वरित रक्कम शेतक-यांच्या लोकवाट्यातुन करण्यात आले आहे. पुर्वी ज्या रस्त्यावरुन बैलगाडी जाणे मुश्किल होते त्या रस्त्याने मोकळा श्वास घेतला असुन एका वेळेस दोन बैलगाडी जातील असा रस्ता बनविण्याचे काम सुरु  आहे. चारच ते आठ दिवसात रस्त्याचे काम पुर्ण. झाले आहे. जाण्यासाठी रस्ता झाल्याने शेतक-यांच्या धान्याच्या राशी वेळेवर होणार असुन कारखानाच्या गाडी शेतात आणता येणार असल्याने ऊसाची लागवडही होऊन त्यांचे उत्पन्नही वाढणार असल्याने या शिवारातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. नविन रस्त्याची पाहणी नितीन पाटील, सुनिल मुगळे, अभियंता कुरेशी, संतोष नायब, पोलीस पाटील संदिप पाटील परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments