शिरोळ येथे लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद
शिरोळ:(प्रतिनिधी सलीमभाई पठाण) आरोग्यवर्धिनी उपकेंद्र शिरोळ येथे आज तिसऱ्यांदा लसीकरण शिबीर घेण्यात आले. आजपर्यंत शिरोळ उपकेंद्रात 232 जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती प्रतिभा येळकर यांनी दिली नागरिक उत्स्फुर्तपणे लस घेण्यासाठी कसलीही मनात शंका न ठेवता आले होते. कोविशील्ड लसीचे शंभर डोस आज शिरोळ व परिसरातील नागरिकांना देण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद जाधव, नामदेव जाधव, अतूल जाधव, झटिंग कदम यांनी सहकार्य केले. अंबुलगा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आधिकारी डॉ.श्रीधर रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवर्धिनी उपकेंद्राचे वैद्यकीय आधिकारी प्रतिभा येळकर, आशा कार्यकर्त्या, जि.प.शाळेचे सहशिक्षक यांनी योग्य प्रकारे शिबीर पार पाडले.
0 Comments