Latest News

6/recent/ticker-posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या सात वर्षांच्या वर्षपूर्ती निमित्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या सात वर्षांच्या वर्षपूर्ती निमित्त कर्मचाऱ्यांचा सत्कार


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कारकीर्दीस ७ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सेवासप्ताह म्हणून  निलंगा येथे नरेंद्र मोदी सरकारच्या सात वर्षांच्या वर्षपूर्ती निमित्त नगरपालिकेतील  सफाई कर्मचारी व उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी कोरोना योध्यांचा सत्कार करण्यात आला केंद्र सरकार मध्ये नरेंद्र मोदींची सत्ता येऊन 7 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 30 मे या दिवशी निलंगा येथे नगर पालिके मध्ये सफाई कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांचा व सरकारी रुग्णालय मधील वैद्यकीय कर्मचारी कोरोना योध्यांचा भारतीय जनता पक्ष निलंगा शहर यांच्या  वतीने सत्कार करण्यात आला. 


यावेळी उपस्थित बाळासाहेब शिंगाडे न.प.अध्यक्ष निलंगा , मनोज कोळे उपाध्यक्ष न.प. निलंगा ,  शरद पेटकर ,  किरण बाहेती ,  विष्णू ढेरे , इरफान सय्यद ,  माधव फट्टे , तुकाराम माळी ,  प्रकाश नाटकर,  रवी फुलारी , प्रकाश पटने,  सुमित इन्नानी,  तम्मा माडीबोणे,   इत्यादी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments