Latest News

6/recent/ticker-posts

प्रा डॉ पांडूरंग मुठ्ठे यांना पी एच डी चे संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता

प्रा डॉ पांडूरंग मुठ्ठे यांना पी एच डी चे संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता


शिरूर अनंतपाळ:( प्रतिनिधी ) येथील शिवनेरी महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ पांडूरंग मुठ्ठे यांना  'समाजशास्त्र' विषयासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड कडून पी एच डी संशोधक मार्गदर्शक म्हणून  विद्यापीठाने नुकतीच मान्यता दिली आहे. याबदल संस्थेचे कोशाध्यक्ष जयेश माने संस्था सचिव पदमाकर मोगरगे, सह-सचिव प्रताप माने,  संस्थेचे संचालक  युवा नेते ॲड सुतेज भैया माने,  प्रभारी प्राचार्य डॉ ओमप्रकाश जाधव , प्राचार्य डॉ राम वाघ , दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . एस पी गायकवाड, सिनेट सदस्य डॉ सुर्यकांत जोगदंड , डॉ . डी .एन .मोरे, समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉ एन. टी. कांबळे , डॉ विजय भोपाळे ,डॉ . श्रीकांत गायकवाड, डॉ विनोद जाधव महाविद्यालयाचे स्टॉफ सेक्रेटरी डॉ प्रशांत पाटील , महा विघालयाचे आय.क्यु.सी समन्वयक डॉ. अमोल लाटे व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकोत्तर कर्मचारी विद्यार्थी मित्र परिवारां ने त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments