Latest News

6/recent/ticker-posts

कोतल शिवणी येथे साई फाउंडेशन च्या वतीने निराधार विधवा महिलांना अन्नदान किटचे वाटप

कोतल शिवणी येथे साई फाउंडेशनच्या वतीने निराधार विधवा महिलांना अन्नधान्य किटचे वाटप


केळगाव
:(प्रतिनिधी/वसीम मुजावर) दि. 30 - निलंगाा तालुक्यातील कोतल शिवणी येथे साई फाऊंडेशनच्या वतीने गरजू निराधार विधवा महिला गरीब कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी साई फाऊंडेशनच्या प्रमुख अँड. रुद्रालीताई पाटील चाकूरकर, ऋषिकाताई पाटिल, निलंगाचे तहसीलदार गणेश जाधव, तलाठी अभिमंन्यु म्हेत्रे, डाँ. शिवनंद दाडगे, गिरीश ब्याळे, चंद्रशेखर वडजे, सरपंच नाना पाटील, स्वप्निल वाघमारे, ज्ञानोबा वाघमारे, आदीनाथ औरादे, अर्जुन वाघमारे, विभाकर देशपांडे, विरनाथ कल्लशेट्टी, गजानन शेळके, महेश शेळके तसेच साई फाऊंडेशन टिम आदीच्या उपस्थितीत covid-19 नियमांचे पालन करत राशन किट व सॅनेटरी पॅड वाटप करण्यात आले. साई फाऊंडेशन मार्फत जिल्ह्यातील  निराधार महिलांना कोरोना काळात मदतीचा हात देण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments