Latest News

6/recent/ticker-posts

केंद्रशासनाने खताच्या किंमती तात्काळ कमी करावे- अशोकराव पाटील निलंगेकर

केंद्रशासनाने खताच्या किंमती तात्काळ कमी करावे- अशोकराव पाटील निलंगेकर



निलंगा:(तालुका/प्रतिनिधी इरफान शेख) केंद्र शासनाने खताच्या व बी-बियाण्याच्या भरमसाठ वाढवलेल्या किंमती त्वरित कमी करावी अशी मागणी काँग्रेस नेते अशोकराव पाटील निलंगेकर यांनी उपविभागीय अधिकारी निलंगा मार्फत केंद्रीय मंत्री यांना दिलेल्या निवेदनात केली आहे पुढे निवेदनात म्हटले की, या निर्णायामुळे कोरोना संसर्गजन्य आजारामध्ये होरपळुन निघालेला शेतकरी वर्ग यांच्यावर मोठा अघात झालेला आहे. सद्यस्थितीला शेतकऱ्यांच्या मालाचा भाव व शेतकऱ्याला माल उत्पादन करण्यासाठी लागणारा खर्च याची गोळाबेरीज केली असता शेतकरी अगोदरच आर्थिक कोंडीत सापडलेला असून या संसर्ग आजारातही शेतकरी वर्ग आजही रात्रदिवस काबाड कष्ट करत आहे. खरीप हंगामात लागणा या खता-बीयासाठी खाजगी बँका, फायनान्स कंपन्या, यांच्याकडून कर्जासाठी पायपीठ करत असलेला दिसून येत आहे. या अगोदर शेतीसाठी लागणा-या खर्चासाठी बँकेकडून, सोसायट्याकडून काढलेले पीक कर्ज शेतकरी आर्थिक परिस्थितीमुळे परतफेड करु शकत नाही. यात हा केंद्र शासनाकडून खत व बी-बियाणे दरवाढीचा निर्णय म्हणजे शेतक्री हा आगीत होरपळल्यासारखा आहे. तसेच केंद्रीय केमीकल्स् व फर्टिलायझर्स खात्याचे मंत्री सदानंद गौडा यांनी बैठकीत खत व बी-बियाणे दरवाढ होणार नाही हा निर्णय घेतला होता. तरीसुध्दा ही भरमसाठ झालेली दरवाढ तात्काळ रद्द करुन जुन्या पध्दतीनेच खत-बि-बीयाण्याचे वाटप करण्याचे या निवेदनाद्वारे शेतक-यांच्या हितासाठी प्रमुख मागण्या केले त्यात १. सन २०२०-२१ साली झालेल्या खरीप हंगामात बी-बियाणे व शेंद्रिय खत यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक व लबाडणूक केलेल्या कंपनीचे बियाणे व शेंद्रिय खते यावर्षीच्या खरीप हंगामात विक्रीस बंदी घालावी. २. या वर्षीच्या खरीप हंगामात दुकानदाराकडे आलेल्या वेगवेगळ्या कंपनीचे खते व बियाणे याची योग्यता कृषी खात्यामार्फत तपासली जावी व योग्य असलेले खते व बियाणे यालाच शेतकऱ्यांना विक्रीसाठी परवानगी द्यावी. जेणेकरुन शेतकऱ्यावरील भविष्यात दुबार- तिबार पेरणीचे संकट येऊ नये ३. प्रत्येक दुकानात खत बियाणे याचे भावफलक लावण्यात यावे. अश्या मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर अशोकराव पाटील निलंगेकर, दयानंद चोपणे, सुरेंद्र धुमाळ, लाला पटेल, अशोक शेटकार, सिराज देशमुख, देविदास जाधव, अमित नितनवरे, सोनाजी कदम, भरत बियाणी आदीच्या साक्षऱ्या आहेत.


Post a Comment

0 Comments