Latest News

6/recent/ticker-posts

सावरी येथील तेरणा नदी पत्रा वरील पुलाचे सुरक्षा पाईप तुटल्याने वाहतुकीस वाढला धोका

सावरी येथील तेरणा नदी पत्रा वरील पुलाचे सुरक्षा पाईप तुटल्याने वाहतुकीस वाढला धोका


केळगाव:(प्रतिनिधी/वसीम मुजावर) सावरी येथील तेरणा नदी पत्रा वरील पुलाचे सुरक्षा पाईप तुटल्याने वाहतुकीस वाढला धोका, पावसाळ्यात होणार अडचण, निलंगा तालुक्यातील सावरी या गावावरून तेरणा नदी वाहते या नदी वरून ताडमुगळी व सावरी या गावांना जोडणारा जुना फुल आहे. त्या पुलावरील रस्त्याच्या सुरक्षा करणारे लोखंडी पाइप तुटल्यामुळे पुलावरून प्रवास करणे त्रासदायक झाले आहे. पुलावरील सुरक्षा भिंत म्हणून काम करणारे लोखंडी पाइप हे तुटून अस्ताव्यस्त पडले आहे यामुळे पावसाळ्यात वाहतूक करताना पुलावरून पाणी जाते त्यावेळेस नेमका कोण कोठे आहे हे दिसत नाही. सदरील नदीवरील बनवण्यात आलेल्या पुलाच्या रस्त्याच्या बाजूच्या लोखंडी पाईप ची दुरुस्ती करून नवीन बांधणी करावी यामुळे शेतकर्याच्या जनावरांचा बैलगाडीचा तोल जाणार नाही व त्यांची सुरक्षा होईल यासाठी शेतकरी व वाहनधारक आतून मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments