Latest News

6/recent/ticker-posts

सावनगीरा गावात " सार्वजनिक स्वंयपाक भवनाची " उभारणी

सावनगीरा गावात " सार्वजनिक  स्वंयपाक भवनाची " उभारणी


निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) निलंगा तालुक्यातील मौजे सावनगीरा येथे 23 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो  अखंड हरिनाम सप्ताह कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सन 2016 ते सन 2021 या सहा वर्षाच्या कालावधीत  दोन लाख पंचान्व हजार पाचशे रूपये बचत करण्यात आले होते. या बचत करण्यात आलेल्या रकमेतून गावात " सार्वजनिक स्वंयपाक भवन सावनगीरा 2021 " असे नामकरण देऊन उभारण्यात आले आहे. या कार्याबद्दल अखंड हरिनाम सप्ताह कमिटीचा गावातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments