Latest News

6/recent/ticker-posts

राज्यातील पेट्रोल, डिझेल दरामध्ये 25 % टक्के दर कपात करा- औसा एमआयएमची मागणी

राज्यातील पेट्रोल, डिझेल दरामध्ये 25 % टक्के दर कपात करा- औसा एमआयएमची मागणी


शेख बी जी

औसा: दि.१८- सध्या राज्यात पेट्रोल व डिझेल बरोबर जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ झाल्याने सर्वसामान्यांना याचा फटका बसत आहे. तसेच  या महगाई व जीवनावश्यक वस्तूंची भाववाढीच्या सर्व सामान्यांना त्रास सहन करावा लागत असल्याने याचबरोबर पेट्रोल, डिझेल दरामध्ये 25 % टक्के दर कमी करण्यात यावे या मागणीचे निवेदन केंद्रीय सचिव, भारत सरकार, मंत्रालय यांना औसा तहसिलदारांमार्फत  औसा एमआयएम इन्चार्ज अफसर शेख यांनी निवेदन दिले आहे. आज दि. 18 जुन 2001 शुक्रवार रोजी पेट्रोल व डिझेल दरांमध्ये 25 % टक्के दरवाढ कमी करा तसेच जीवनावश्यक वस्तूंचे भाववाढ कमी करण्यासाठी केंद्रीय सचिव, पेट्रोलियम विभाग, भारत सरकार, व सचिव, विक्री कर विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना औसा तहसीलदार शोभा पुजारी यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे. याच बरोबर जीवनावश्यक वस्तूंची भरमसाठ भाव वाढ झाल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत असल्यामुळे सर्व सामान्यांचे आर्थिक गणित कोलमडून गेली आहे केंद्र शासन 33/- रुपये प्रति लिटर पेट्रोल व 32 रुपये प्रति लिटर डिझेलवर कर आकारणी केली आहे. तसेच राज्य शासन व्हॅटच्या नावावर 25 % टक्के प्रति लिटर पेट्रोल व 22 टक्के प्रति लिटर डिझेल वर व्हॅट कर आकारणी लावून जनतेवर आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. केंद्र व राज्य शासनाने पेट्रोल-डिझेल वर लावलेले टॅक्सेस कर आकारणी च्या नावाखाली  त्रास सहन करावा लागत आहे केंद्र व राज्य शासनाने आकारलेल्या कमी करून 25 टक्के घट कपात करण्यात यावी या मागणीचे निवेदन केंद्रीय मंत्रालय व राज्य विक्रीकर विभागाला पाठवून जनतेस न्याय द्यावा असे अशी मागणी अफसर शेख यांनी केली आहे. या निवेदनावर शेख अखिल, सुलतान शेख, सय्यद अरबाज, शेख जाफर, अॅड आर एम शेख, सिद्दिकी मुखीद, सुलतान शेख, अखिल शेख, अरबाज सय्यद, जफर शेख यांच्या उपस्थित निवेदन देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments