Latest News

6/recent/ticker-posts

आता मिळणार विना टी सी शाळेत दाखला;शाळांच्या जबरदस्तीला चाप

आता मिळणार विना टी सी शाळेत दाखला;शाळांच्या जबरदस्तीला चाप


मुंबई:(प्रतिनिधी) संस्थाचालकांच्या तुघलकी कारभाराला आता महाविकास आघाडी सरकारने लगाम घातला आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे टीसीसाठी (T.C/L.C) अडवणूक करणाऱ्या शाळांना या निर्णयाचा चांगलाच दणका बसला आहे. विद्यार्थ्यांना आता टीसीशिवाय दुसऱ्या शाळेत प्रवेश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. प्रत्येक मुलाला शिकण्याचा तसेच एका शाळेतून दुसऱ्या शाळेत प्रवेश घेण्याचा अधिकार आहे. सध्याच्या असामान्य परिस्थितीत आर्थिक कारणांमुळे शालेय शुल्क भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला (T.C/L.C) काही शाळा नाकारत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने विद्यार्थ्यांना इतर शासकीय व अनुदानित शाळांत प्रवेश नाकारला जात असल्याचे कळते. केवळ L.C./T.C. नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणे अन्यायकारक तसेच RTE कायद्याची पायमल्ली करणारे आहे. याबाबत महाविकास आघाडी सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्यांचा T.C/L.C उशिरा दिला जात असेल किंवा नाकारला असेल अशा विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देऊन मा.शा.सं. मधील तरतुदीनुसार पुढील कार्यवाही करावी. शिक्षण अधिकार कायद्यांतर्गत आठवीपर्यंत अशी तरतूद आहे. हा नियम आता नववी-दहावीच्या प्रवेशासाठी सुद्धा लागू केला आहे.

Post a Comment

0 Comments