Latest News

6/recent/ticker-posts

भादा जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख यांच्या हस्ते मियावाकी वृक्ष लागवड

भादा जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख यांच्या हस्ते मियावाकी वृक्ष लागवड 


बी डी उबाळे

औसा: तालुक्यातील भादा येथे जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख यांच्या हस्ते ग्राम पंचायत भादा कडून प्राथमिक आरोग्य केंद्र भादा येथे मियावाकी वृक्ष लागवड करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र भादा येथे गुरुवार दिनांक 17 जून 2021 रोजी दुपारी भादा जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख यांच्या हस्ते मियावाकी पद्धतीचे 1हजार 200 नवीन वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी भादा येथील उपसरपंच बालाजी शिंदे , ग्राम विकास अधिकारी माणिक सूर्यवंशी,ग्रा प सदस्य सूर्यकांत उबाळे आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ एन व्ही पत्तेवार मॅडम आणि आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments