Latest News

6/recent/ticker-posts

निटुरकरांना कधी तिचा हाय, कधी बाय ! वाट बघावं का नादच सोडावा कळना करावं काय !!

निटुरकरांना कधी तिचा हाय, कधी बाय ! वाट बघावं का नादच सोडावा कळना करावं काय !! 


के वाय पटवेकर

निटूर: आजकाल निटुरकरांसाठी तिचं येणं, तिचं जाणं,  एक  काळजातली ' धकधकच ' होउन बसली आहे.  गेल्या काही दिवसा पासुन निटुरात अचानकच ती येते कधी थांबते अन् मनाला जरा बरं वाटालं  कि अचानकच  जाते. तीच्या या विचित्र  येती - जातीनं निटुरकर  सध्या परेशान असुन तीच्या या लहरी पणाचा कधी फटका तर कधी झटका निटुरकरांना सोसावा लागत आहे. तीनं कितीही चकल्या मारल्याच तरीपण शेवटी आजही निटुरकरांना तिचा ' इंतजार ' आहेच.  वैतागुन तिच्या या लहरी पणाचा जाब संबंधीतांना निटुरकरांना विचारला कि एकच उत्तर सर्वांना मिळते... ते म्हणजे   हा   तिच्या निटुरात  येण्या जाण्याचा लपंडाव वरुणच आहे आता वरुण ठिकाणाचा शोध नेमका निलंगा, लातुर, कि परळी ? ती येते कोठुन आण जाते कोठे हेच गेल्या कित्येक दिवसा पासुन निटुरकरांना कळेना झाले आहे.  एवढे मात्र खरे कि तीच्या या लहरीपणाचा निटुरकरांना कितीही वैताग आला तरीही ती गावात येताच  सर्वांना बरेच वाटते. अशी हि महावितरणची विद्युत या गावाला कधी उकाड्यात कोंडुन मारते तर कधी  लख्ख प्रकाश देते. मात्र येथे महावितरणच्या कर्मचा-यात व्यवस्थापणाचा कसलाच ताळमेळ नसुन  कामाच्या बाबतीत चले तो चॉंद तक बिघडे तो घुटनो तक चा प्रकार दिसतो. लाईट सतत अधुन मधुन का जाते। ती कधी येईल , नेमका अडथळा कोठुन आहे.  गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी तर लाईट वेळेवर येईल का या सर्वांसाठी संबंधीत कर्मचा-याकडुन एकच उत्तर असते. ते म्हणजे ती वरुणच गेली आहे. जणु महावितरण मध्ये भरती होताना यांना अनेक प्रश्नांचे एकच कायदेशीर उत्तर देणं बंधणकारक केलं असेल् ते काहीही असलं तरी महावितरणच्या इथल्या कर्मचा-यांचं वागणं म्हणजे कोंबडी कापुन पंखाखाली अंडे दिसतात का बघा म्हणल्या सारखं बेफीक्रीचं आहे.

Post a Comment

0 Comments