Latest News

6/recent/ticker-posts

डॉ. आर.आर.शेख व गोविंद जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

डॉ. आर.आर.शेख व गोविंद जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण



शेख बी जी

औसा: दि.५ शहरातील ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी डॉ आर आर शेख व नगरसेवक गोविंद जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ऑर्बिट प्री-प्रायमरी शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर दोन्ही व्यक्तींचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी अजहर हाश्मी, मजहर पटेल, कबीर सर , Adv. इक्बाल शेख, पत्रकार आसिफ पटेल, अल्ताफ चौधरी, मनियारी, शेख बी. जी. आदी उपस्थित होते.  मजहर पटेल यांनी आभार व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments