Latest News

6/recent/ticker-posts

अल्फारुख उर्दू शाळेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

अल्फारुख उर्दू शाळेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण


नळेगाव:(प्रतिनिधी बाळासाहेब बरचे) नळेगाव येथील अल्फारुख उर्दू शाळेत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक कादिर जहागिरदार यांनी पर्यावरणदीनाबद्दल मनोगत व्यक्त केले. यासाठी आपल्याला झाडे लावा झाडे वाचवा हि मोहीम राबवली पाहिजे आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपल्याला सगळ्यांच्या प्रयत्नांनी हरित सृष्टी निर्माण झाली तरच हि पृथ्वी वाचू शकेल, असे मत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापक कादिर जागिरदार, वहाब जागिरदार, एम.आर शेख, ए.जी देशमुख, आय.जी सय्यद, के. सी शेख, बि.के मुंजेवार, यु एस इनामदार, एम.आय शेख आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments