कोरोना विरुद्धच्या लढाईतील योगदानात बाळू सोमाणी ठरले देवदूत
निलंगा:(तालुका प्रतिनिधी/इरफान शेख) जिवलग फौंडेशन व सोमाणी परिवार यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये दिलेल्या योगदानाबद्दल आज शुक्रवारी निखिलजी पिंगळे (जिल्हा पोलीस अधिक्षक लातूर) यांच्या हस्ते सन्मान व कार्याचा गौरव करण्यात आला यावेळी उपस्थित जी.श्रीकांतजी (सहआयुक्त ,विक्रीकर विभाग औरंगाबाद) , अरविंदजी पाटील निलंगेकर आदी जण होते. लक्ष्मीकांत(बाळू ) सोमाणी स्वतःहून सर्व सेवाभावी संस्थांना आव्हाने करून वेगवेगळ्या संघटना व सेवाभावी संस्थांना गरजेप्रमाणे रूग्णालयाला मदतीसाठी पाठपुरावा करत असत व सर्व सेवाभावी संघटना व संस्थांनी बाळू सोमाणी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मदत करत होते याचमाध्यमातून वॉटर फिल्टर ,ऑक्सिजन पाईपलाईन, आय.सी.यु रुग्णांच्या सेवेत आहे तसेच तिसरी लाट लहान मुलांमध्ये होईल अशी शक्यता वर्तवली जात असताना सर्वांच्या सहकार्याने उपजिल्हा रुग्णालय निलंगा येते पेडेक्ट्रिक आय.सी.यु तयार करण्यात आले आहे त्यांचे लवकरच उदघाटन होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व मूर्त्युचे प्रमाण वाढत होते ती परिस्थिती खूप भयंकर निर्माण झाली होती. बाळू सोमाणी व बाळू मणियार व अनंत कारभारी व मित्रमंडळाने गेल्या वर्षी उपजिल्हा रुग्णालयात 21 पंखे व रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना जेवणाचे डब्बे, फळे, बिस्कीट, मास्क अश्या प्रकारची सेवा उपलब्ध करून दिली होती. यासेवेबद्दल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.दिलीपजी सौदळे यांनी सत्कार केला होता. या वर्षीही बाळू सोमाणी, रंतीकांत अट्टल, सचिन राठी मागील काही दिवसापासून या परिस्थितीत कोविड योद्धाचा आधार ठरत आहेत रोज सायंकाळी 5:00 वाजता स्वतः बाळू सोमाणी येऊन चहा व बिस्कीट सर्व कर्मचारी व अधिकारी यांना देत होते व कोविड पॉझिटिव्ह रुग्णाला रुग्णालयात दाखल करणे, नातेवाईकाला व्यवस्थित सल्ला देणे कसल्याही प्रकारची कोवीड रुग्णाची व नातेवाईकांची काही अडचण असेल रुग्णालयात स्वतः बाळू सोमाणी जाऊन छोट्या-मोठ्या अडचणीला सदैव तत्पर होते.

0 Comments