पर्यावरण रक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी- पो.नि. परमेश्वर कदम
प्रशांत तांबोळकर
शिरुरअनंतपाळ: पर्यावरणाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकाची आहे. त्यामुळे प्रदुषण होणार नाही. याची काळजी घेण्याबरोबरच झाडे लावुन ती जगवीली पाहीजेत. घरातील प्रत्येक कुटुंब प्रमुखाने किमान एक तरी झाड लावावे, सायकलचा वापर करुन प्लास्टीकला हद्दपार करायला हवे असे मत शिरूरअनंतपाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक परमेश्वर कदम यांनी व्यक्त केले. पाच जुन जागतीक पर्यावरण दिनाचे औच्यित्त साधुन येरोळ येथील ग्राम पंचायतीच्या वतीने येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या पाटीमागे असलेल्या हानमंवाडी रोडच्या दोन्ही बाजुने शनीवारी १०१ विविध औषध उपयोगी वृक्षाची लागवड पो.नि. परमेश्वर कदम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या काळात आॅक्सिजनचे महत्व काय असते. हे आज प्रत्येकाला कळुन चुकले आहे. आॅक्सिजन निर्सगाने माणवाला दिलेले वरदान असुन वृक्षाची लागवड व जोपासना करणे काळाची गरज असल्याचे ही ते म्हणाले. यावेळी आरोग्य विस्तार अधिकारी सुर्यवंशी यांनी पर्यावरण विषयक माहीती दिली. यावेळी सरपंच सौ. सुकमार लोकरे , उपसरपंच सतिसभैया सिंदाळकर , ग्रामविस्तार अधिकारी बी.जी. पठाण . ग्रा.प. सदस्य आमर पाटील , एल,जी. लोंढे , गोविंद पोतदार , मगेंश पाटील , भागवत तोंडारे , बाबुराव वाघमारे , विनोद लोंढे , बस्वराज चौसष्टे , आमर माडजे , दत्ताञ्य तुमकुटे , रवि पाटील , ओमप्रकाश तांबोळकर , बालाजी झटे , बालाजी चौसष्टे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

0 Comments